बातमी मागची बातमी

VIDEO | सावरकरांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ

वैदेही काणेकर आणि राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीला चक्रव्युहात पकडण्याची खेळी भाजपनं केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनी त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव सादर करण्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. सावरकरांच्या गौरव प्रस्तावाची मागणी भाजपानं लावून धरली, मात्र या मागणीला विधानसभाध्यक्ष नाना पटोलेंनी दाद दिली नाही.

सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. हा प्रस्ताव  फेटाळल्यानं नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 


नाना पटोलेंनी जरी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी दुसरीकडे सावरकरांचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. 

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत समन्वय नाही, किंबहुना मतभेदच आहेत. शिवसेना सावरकरवादी आहेच, काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचाही सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध नाहीये. त्यामुळे याचाच फायदा उचलत सावरकरांच्या मुद्द्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपनं महाविकास आघाडी सरकारला चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

WebTittle :: VIDEO | From Savarkar's point in the Assembly

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भीषण दुर्घटना! हॉटेलमध्ये ४ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

New Rules: गॅस सिलिंडरपासून ते बँकिंगपर्यंत...; आजपासून ८ नियम बदलले, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

SCROLL FOR NEXT