कल्याण : कल्याण Kalyan पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी Thieves हनुमानाच्या मंदिरातून Temple तांबा पितळेच्या वस्तू चोरल्या. चोरी Theft केल्यानंतर हे दोन्ही चोरटे रस्त्यावरून जात असताना गस्तीवर असलेल्या कोळशेवाडी Kolshewadi पोलिसांच्या Police पथकाचे त्यांच्या कडे लक्ष गेले.
या दोघांच्या संशयास्पद Suspicious हालचालीमुळे पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पितळेच्या मुर्त्या व भांडी आढळली. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने या दोन्ही चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतले.
सदर घटनेच्या काही वेळापूर्वीच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात चक्की नाका परिसरातील एका हनुमानाच्या मंदिरात चोरी झाल्याची तक्रार Complaint नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी या मंदिराचे सीसीटीव्ही CCTV तपासले असता मंदिरात चोरी करणारे चोरटे हेच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तत्काळ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. इरफान खान आणि फैजल खान अशी या दोन्ही चोरट्यांची नावे असून दोघे मुंबईतील Mumbai गोवंडी Govandi या परिसरातील राहणारे आहेत.
दुसरीकडे वाढत्या चैन स्नेचिंगच्या Snatching घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्ती भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी वसई Vasai पोलिसांच्या पथकावर हल्ला Attack करणारा मास्टर माईंड व 100 हुन अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेला चोरट्यांचा म्होरक्या हैदर याला पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले होते.
त्या पाठोपाठ याच वस्तीमधून आणखी एका सराईत चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल्ला इराणी उर्फ सैय्यद अस या चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 56 गुन्हे दाखल आहेत.
या मधील 22 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 16 चोरीच्या मोटरसायकलसह 61 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. अब्दुल्ला हा काही महिन्यांपूर्वी आंबिवली येथे वसई पोलिसांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.