बातमी मागची बातमी

कोरोना इफेक्ट : शरद पवारांचा जळगाव दौरा स्थगित

सरकारनामा


जळगाव : "कोरोना'व्हायरस अधिक पसरू नये यासाठी शासनातर्फे दखल घेण्यात येत आहे. 50 किंवा त्या पेक्षा अधिक लोकांनी जमू नये,लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवार (ता.9) चा जळगाव दौरा स्थगित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता.9) जळगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. चांदसर (ता.धरणगाव)येथे शेतकरी मेळावा व माजी आमदार (कै.)मु.ग.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. तर शेदुर्णी (ता.जामनेर)येथेही जाहिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

देशात "कोरोना'व्हायरसचा धोका निर्माण झाल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनीही दौरा स्थगितीला दुजोरा दिला आहे. शेंदुर्णी येथील कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड यांनी सांगितले, "कोरोना'व्हायरसचा धोका लक्षात घेवून दौरा स्थगित करण्यात आला आहे. दिल्ली येथून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यकांनी दुपारी दोन वाजता फोन करून दौरा स्थगित झाल्याचे आपणास सांगितले.

याबाबत जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, कार्यक्रम रद्द करण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. परंतु "कोरोना'व्हायरस लागण पसरण्याचा धोका लक्षात लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळायला हवेत. असे अवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजक निर्णय घेत आहेत. 
 

WebTittle :: Corona Effect: Sharad Pawar's Jalgaon tour postponed 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT