UPSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

UPSC Recruitment: कोणत्याही परिक्षेशिवाय सरकारी नोकरी, UPSC अंतर्गत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

UPSC Recruitment For CBI: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाअंतर्गत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी म्हटल्यावर अनेकदा परीक्षा द्यावी लागणार, असा विचार अनेकांच्या मनात येतो. परंतु यूपीएससी परीक्षा न देता तुम्ही नोकरी मिळवू शकतात. सध्या यूपीएससीअंतर्गत सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनसाठी (Central Breau Of Investigation) भरती सुरु आहे. (Government Job)

केंद्रिय लोकसेवा आयोगाअंतर्गत असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ९ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तसेच अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे. असिस्टंट प्रोग्रामरची ही भरती सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनअंतर्गत निघाली आहे.

असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले असावे. तसेच मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी किंवा बॅचलर ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराला कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त असावी.(UPSC Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी अर्ज फी फक्त २५ रुपये आहे. तसेच महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत, रिक्रूटमेंट टेस्ट आणि कागदपत्रे पडताळणीनंतर केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT