Bank Job Saam TV
naukri-job-news

Bank Job: युको बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

UCO Bank Recruitment: युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत सध्या भरती सुरु आहे. युको बँकेत २५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. युको बँकेत अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

युको बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत बँकेने अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (UCO Bank job)

युको बँकेतील भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ७० जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या राज्यात अर्ज करु शकतात. त्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवीधर असणे गरजेचे आहे. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (UCO Bank Recruitment)

या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, अर्थव्यवस्था, इंग्रजी याबाबतचे प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT