SEBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SEBI Recruitment: सेबीमध्ये ग्रेड A ऑफिसर पदासाठी भरती; पगार १.८४ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SEBI Grade A Recruitment Notification Out: सेबीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेबीमध्ये ग्रेड ए ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

ऑफिसर ग्रेड ए पदांसाठी भरती सुरु

पगार मिळणार १,८४,००० रुपये

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. सेबीमध्ये ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही www.sebi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सेबीमधील या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या अधिसूचनेत तुम्हाला पदाची, पात्रता आणि पगाराबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

सेबीमधील असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती वेगवेगळ्या विभागात निघाली आहे. यासाठी उमेदवारांनी मास्टर्स डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा / लॉमध्ये बॅचलर डिग्री / इंजिनियरिंगमध्ये बॅचलर / चार्टर्ड अकाउंटंट / चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट / कंपनी सेक्रेटरी / कॉस्ट अकाउंटंट / मास्टर्स डिग्री/ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग / सिविल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे पदवीधारक अर्ज करु शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना चेक करा.

सेबीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा फेज १, फेज २ आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या परीक्षांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, लवकरच परीक्षांबाबत माहिती समोर येईल. ही परीक्षा पास केल्यानंतर तुमची नोकरीसाठी निवड होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १,८४,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ही एक चूक पडू शकते महागात, मिळणार नाही ₹२०००;लगेच चेक करा अपडेट

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीच्या दंडाचा कचकन चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

SCROLL FOR NEXT