सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी बँकेत नोकरी मिळाल्यावर चांगला पगार मिळतो. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कन्करन्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही स्टेट बँकेच्या sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
स्टेट बँकेत एकूण ११९४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बँकेचा रिटायर्ड कर्मचारी असणे गरजेचे आहे. उमेदवाराची वयोमर्यादा ६० वर्षे असावी.
स्टेट बँक किंवा इतर बँकेतील रिटायर्ड ऑफिसर ज्यांनी एमएमजीएस-III, एमएमजीएस IV/V,टीईजीएस IV कॅडर सर्विसमध्ये काम केलेले असावे. या नोकरीसाठी अधिक माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा पगार रिटायर्ड ग्रेडच्या आधारे असणार आहे. ४५००० ते ८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कामाचा कालावधी ही १ ते ३ वर्ष असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.