SAIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SAIL Recruitment 2025: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टील ऑथोरिटीमध्ये इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अधिसूचना वाचावी.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील (SAIL Recruitment) या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करु शकतात.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनिअर इंजिनियरिंग असोसिएट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी www.sail.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. एक वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर असोसिएट पदासाठी २६६०० ते ३८९२० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Eligibility)

सेलमधील या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. तुम्ही १०वी पास असणे गरजेचे आहे.ज्युनिअर इंजिनियरिंग असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ३ वर्षांचा डिप्लोमा मॅकेनिकल /इलेक्ट्रिकल/केमिकल/पावर प्लांट/प्रोडक्शन/इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग डिसिप्लीनमध्ये केलेला असावा.

असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) पदासाठी उमेदवारांनी बी.ई किंवा बीटेक केलेले असावे. याचसोबत २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT