RRB NTPC Recruitment 2024 Registration 
naukri-job-news

RRB NTPC Recruitment 2024: बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; रेल्वेमध्ये ३४४५ पदांसाठी भरती, अर्ज नोंदणी सुरू

Bharat Jadhav

तुम्ही बारावी उत्तीर्ण आहात? तुमचं शिक्षण फक्त बारावीपर्यंतच झाल्यामुळे नोकरीची चिंता सतावत आहे का? काळजी नका करू, कारण बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी चालू आलीय. ज्या उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. ज्यांना नोकरी करायची आहे, ते आता अरद करू शकतात.

रेल्वेत नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला आरआरबीच्या वेबसाइटला भेट द्यावे लागेल. या अधिकृत संकेतस्थळावरून लोक पायलट ते इतर विभागात २ ते ३ श्रेणीतील एकूण ३३४५ पदांची भरती केली जाणार आहे.

या पदांसाठी अर्ज नोंदणी करण्याची सुरूवात २१ सप्टेंबरपासून सुरू झाली. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. अखेरची तारीख येईपर्यंत योग्य पद्धतीने अर्ज करून टाका. काही दिवसाआधी आरआरबीने पदवी उत्तीर्ण आणि अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती करण्यात आली होती. पदवीधर पदांसाठी १४ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. याद्वारे एकूण ८११३ पदे भरली जाणार आहेत.

तर बारावी पास झालेल्या उमेदवारांची ३४४५ पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 १२ ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या पदांसाठी १८ ते ३३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आलीय. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना त्यांच्या विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागले.

अनेक स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या पदांसाठी निवड केली जाईल. प्रथम सीबीटी एक चाचणी होईल. जे पास होतील ते CBT 2 साठी दिसतील. पुढील टप्प्यात टायपिंग कौशल्य चाचणी/संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी पोस्टनुसार घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची कागदपत्र पडताळणी फेरी होईल त्यानंतर शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

फी किती लागेल

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल, त्यापैकी ४०० रुपये CBT 1 मध्ये हजर झाल्यानंतर परत केले जातील. SC, ST, Ex-SM, PWBD, महिला उमेदवारांना फी म्हणून २५० रुपये भरावे लागतील. हे संपूर्ण पैसे CBT 1 परीक्षा दिल्यानंतर परत केले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra News Live Updates : आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार

Satara : इंद्रधनुष्याची चादर अन् डोंगर रांगा, साताऱ्यातील गाव पाहून होईल स्वर्गाची अनुभूती

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Beetroot Juice: सकाळी बिटरुट ज्यूस पिण्याचे जबरद्स्त फायदे...

SCROLL FOR NEXT