RBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरी अन् २२५००० रुपये पगार; डेप्युटी गवर्नर पदासाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

RBI Recruitment 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. डेप्युटी गवर्नर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी गवर्नर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपये पगार मिळणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या नोकरीसाठी तेच लोक अर्ज करु शकतात ज्यांना संबंधित क्षेत्रात कामाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. (RBI Recruitment)

डेप्युटी गवर्नर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल १७ नुसार वेतन दिले जाणार आहे. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

डेप्युटी गवर्नर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन सेक्टरमध्ये कमीत कमी २५ वर्ष काम केलेले असावे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पब्लिक फायनानशियल इन्स्टिट्यूटमध्ये २५ वर्ष कामाचा अनुभव असावा.संबंधित क्षेत्रात मेरिट आणि ट्रॅक रेकॉर्ड चांगला असावा.

डेप्युटी गवर्नर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २,२५,००० रुपये वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३ वर्षांसाठी अपॉइंटमेंट होती. (Reserve Bank Of India Recruitment For Deputy Governer Post)

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.या नमुन्यात सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर हा अर्ज तुम्हाला श्री संजय कुमार मिश्रा, अंडर सेक्रेटरी (BO.1), डिपार्टमेंट ऑफ फायनानशियल सर्विसेस, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, दुसरा मजला, जीवन दीप बिल्डिंग, पार्लियामेंट स्ट्रीट, नवी दिल्ली- ११०००१ येथे पाठवायचा आहे.(RBI Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT