Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप सी आणि डी पदांसाठी भरती, पगार किती? जाणून घ्या

Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेत स्पोर्ट्सपर्सन या पदासाठी भरती सुरु आहे. त्यामुळे खेळाची आवड असलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वेत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी मुदतीआधी अर्ज करावेत.

रेल्वेमध्ये खेळाडू पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, शुटिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, पॉवर लिफ्टिंग, वॉलिबॉल,क्रिकेटसह अनेक खेळातील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ग्रुप सी पदांसाठी २१ जागा रिक्त आहे. ग्रुप डी पदांसाठी ३९ जागा रिक्त आहे. एकूण ६० रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. (Railway Job)

रेल्वे स्पोर्ट्सकोटाअंतर्गत लेव्हल ४ आणि ५ साठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. लेवल २ आणि ३ साठी १०वी आणि १२ वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तर लेव्हल १ पदासाठी १०वी आणि आयआयटी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांना ५२०० ते २०२०० रुपये पगार मिळणार आहे.१८ ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Railway Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT