Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; १५८ रिक्त पदांवर भरती; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

Punjab And Sind Bank Recruitment: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पंजाब अँड सिंध बँकेत (Punjab And Sind Bank) नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. करिअरची सुरुवात करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला punjabandsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

पंजाब अँड सिंध बँकेत १५८ रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस उरले आहेत.

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असावी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (PSB Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. १२वीला मिळालेले गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेत भरती (NMCC Recruitment)

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधीदेखील तुमच्याकडे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत गट क आणि गट डमधील भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, वित्त या विभागांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. इंजिनियर ते वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT