pm narendra modi and ratan tata saam tv
naukri-job-news

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रतन टाटांना दिली मोठी जबाबदारी, 'या' पदावर केली नियुक्ती

देशातील काही दिग्गज व्यक्तींना सल्लागार समितीत घेण्यात आलं आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि टाटा संन्सचे चेअरमन रतन टाटा यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांची पीएम केअर फंडचे नवे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा यांच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश केटी थॉमस आणि लोकसभचे माजी डेप्युटी स्पीकर करिया मुंडा यांना पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Businessman ratan tata appointed as trustee of pm care fund)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही दिग्गज व्यक्तींना सल्लागार समितीत घेण्यात आलं आहे. या सल्लागार समितीत पूर्व कॅग राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनचे माजी चेअरपर्सन सुधा मूर्ती, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी सीइओ आनंद शाह यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण उपस्थित होत्या. तसेच नव्याने नियुक्त केलेल्या सदस्यांनीही या बैठकीत हजेरी लावली. मोदींनी यावेळी नवनिर्वाचीत विश्वस्तांचे स्वागत केले. पीएम केअर फंड २०२० ला कोरोना महामारीच्या काळात आपातकालीन परिस्थितीसाठी सुरु करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT