PGCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

PGCIL Recruitment: सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; ८०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

PGCIL Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ८०२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्याकडे सरकारी करण्याची उत्तम संधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ८०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची शेवटची तारीख आज आहे.या नोकरीसाठी तुम्ही आता १९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. (Government Job)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल)/ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR/F&A), असिस्टंट ऑफिसर ट्रेनी (F&A) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इलेक्ट्रिकल डिप्लोमा/ इलेक्ट्रिकल पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टिम इंजिनियरिंग / पॉवर इंजिनियरिंग ट्रेडमध्ये डिप्लोमा केलेला असावा. डिप्लोमा करताना ७० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीबीए/ बीबीएम / बीबीएएसी पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनियर ऑफिसर ट्रेनी पदासाठी इंटर CA/ इंटर CMA Exam पास केलेली असावी. तसेच असिस्टंट प्रोफेसर पदासाठी बी. कॉम पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (PGCIL Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २७ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेगवारांना ३०० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये फी भरायची आहे. (Pgcil Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT