OIL India Recruitment Saam Tv
naukri-job-news

OIL India Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; ऑइल इंडियामध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

OIL India Recruitment 2025: तरुणांकडेे सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. ऑइल इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India Recruitment) नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑइल इंडिया ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत सध्या भरती सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ऑइल इंडियामध्ये असिस्टंट ऑपरेटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ऑइल इंडियामध्ये १०वी पास आणि टेक्निकल क्षेत्रात कामाचा अनुभव असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी उमेदवार २७ जूनला होणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये भाग घेऊ शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला oil-india.com वर जाऊन अर्ज करावा लागेल. एकूण १४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही २७ जून किंवा त्याआधी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

पात्रता (Eligibility)

ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत मॅकेनिक, फिटर किंवा इंस्ट्रुमें मॅकेनिक ट्रेडमध्ये सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. तसेच कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.वॉटर इंजेक्शन स्टेशन, गॅस कंप्रेसर स्टेशन, तेल किंवा गॅस उत्पादन, पॅरामेडिकल इंडस्ट्री किंवा IOR/EOR सुविधांमध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ऑइल इंडियामधील नोकरीसाठी उमेदवारांना २१,४५० रुपये पगार मिळणार आहे. हा पगार तुम्ही जेवढे दिवस काम करणार त्यावर आधारित आहे.या नोकरीसाठी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐतिहासिक निर्णय! सर्वोच्च न्यायालयाची हरीशला इच्छामरणाची मंजूरी, नेमकं काय प्रकरण काय?

Tina Ahuja: गोविंदा-सुनीता नात्याबद्दल मुलीने उघड केलं सत्य; म्हणाली, 'गेल्या दोन वर्षांत खूप बदल…'

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Eyeglasses Cleaning Tips : चष्मा स्वच्छ कसा करावा? स्क्रॅचेस आणि डाग टाळण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स

BP And Cholesterol : BP आणि कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी आत्ताच नाश्त्यात करा हा १ बदल; लगेचच मिळेल आराम, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT