MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Job: एसटी महामंडळात नोकरीची संधी, २०८ रिक्त जागा, पात्रता फक्त १०वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात २०८ रिक्त पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (ST Mahamandal job)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात २०८ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.एसटी महामंडळ यवतमाळ येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ असावे.मोटर मेकॅनिकसाठी ७५ पदे रिक्त आहे. शिटमेटल पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. डिझेल मेकॅनिकसाठी ३४ जागा रिक्त आहेत. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी ३० पदे रिक्त आहेत. वेल्डरसाठी २० जागा रिक्त आहेत. टर्नर आणि पेंटर जनरल या पदांसाठीही रिक्त जागा आहेत. (MSRTC Recruitment)

१०वी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना ५९० रुपये अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (MSRTC Recruitment)

NHAI भरती

सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास तुम्हाला २ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT