Mazagaon Dock Job Saam Tv
naukri-job-news

Mazagaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करा, महिन्याला ८३००० कमवा; कोणत्या पदासाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Mazagaon Dock Job Recruitment: माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. Mazgaon Dock Shipbuilders Limited मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Mazagaon Dock Job)

नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणर आहे. १०वी पास, आयटीआय आणि संबंधित ट्रेडमधील सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. mazgaondock.in या वेबसाइटवर जाऊन करिअर हे ऑप्शन निवडा. यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करुन नोंदणी करा. यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरा. यानंतर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी जनरल, ओबीसी, EWS गटातील उमेदवारांना ३५४ रुपये भरावे लागणार आहे.तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी स्पेशल ग्रेड, स्कि ग्रेड आणि सेमी स्किल ग्रेड अशा पदानुसार विभागले जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १३२०० ते ८३१८० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT