Government Job Saam TV
naukri-job-news

Government Job: महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; पात्रता पदवीधर; अशा पद्धतीने करा अर्ज

Mahila V Balvikas Bharti: महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आणि संरक्षण आयोगावर ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात भरती सुरु आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (Mahila V Balvikas Bharti)

महिला व बालविकास विभागात अध्यक्ष आणि सदस्य अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आणि संरक्षण आयोगावर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

अध्यक्ष पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बालकांच्या कल्याण व विकासाशी निगडीत काम केलेले असावे. सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने याआधी दोन वेळा अध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम केलेले असावे. एकूण ७ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. (Mahila V Balvikas Recruitment)

महिला व बालविकास विभागातील या भरतीची माहिती https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज आयुक्त कार्यालय,महिला व बालविकास आयुक्तालय, २८ राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य- पुणे १ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT