Mahavitaran Recruitment Google
naukri-job-news

Mahavitaran Recruitment: महावितरण विभागात नोकरीची जबरदस्त संधी, तब्बल २,७०,००० मिळणार पगार; असा करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण विभागात नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २,७०,००० रुपये वेतन मिळणार आहे.

Siddhi Hande

महावितरण मुंबई कार्यालयात नोकरीची संधी आहे. चीफ इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. महावितरण कार्यालयातील या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महावितरण कार्यालयात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महावितरण मुंबई कार्यालयात एकूण ८ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अधिकृत वेबसाइटवर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२४ आहे.

महावितरण मुंबई कार्यालयात इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-BCR/RC) रिक्रुटमेंट सेल, महावितरण, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ५० वर्ष असावे.अर्ज करताना उमेदवाराला ७०८ रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराला तब्बल १,४०,६५५ ते २,७२,२१५ रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीआधीच अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT