ISRO Recruitment Saam Tv
naukri-job-news

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इस्त्रोमध्ये सध्या १४१ पदांसाठी भरती जाहीर करायची आहे.

Siddhi Hande

इस्त्रोमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इस्त्रोमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धव अंतराळ केंद्रात भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी apps.shar.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे.

इंडियन स्पेस रिसर्च सेंटर ही अंतरिक्ष संस्था आहे. यामध्ये सर्व टेक्निकल आणि रिसर्च अशी कामे होतात. सायंटिस्ट एससी पदासाठी २३ जागा रिक्त आहेत. टेक्निकल असिस्टंट पदासाठी २८ तर सायंटिफिक असिस्टंट पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. लायबॅरी असिस्टंट ए पदासाठी १ जागा, रेडियोग्राफर पदासाठी १, टेक्निशियन बी पदासाठी ७० जागा रिक्त आहेत.

इस्त्रोमधील या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. बी.ई/बीटेक/बीएससी इंजीनियर/डिप्लोमा/केमिकल इंजीनियरिंग डिप्लोमा/बीएससी/बीए/ग्रेजुएशन/SSLC/SSC पास असावे. याचसोबत आईटीआई/10वीं पास/नर्सिंग डिप्लोमा केलेला असावा. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १९९०० ते १७७५०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्कील टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकलद्वारे करणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी apps.shar.gov.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर करिअर सेक्शनमधील SDSC SHAR/RMT/01/2025 dated 16.10.2025 View Advertisement वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. यासाठी आधी रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेन झाल्यानंतर लॉग इन करावे. त्यानंतर सर्व माहिती भरुन फॉर्म अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT