IPL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IPL Recruitment: IPL मध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

IIFCL Recruitment 2025: IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये (IPL) नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयपीएलमध्ये भरची जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट iifclprojects.in वर जाऊन अर्ज करायचे आहे. त्याआधी तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचून घ्यावी.

आयपीएलमधील या भरती मोहिमेत एकूण ८ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

आयपीएलमध्ये मॅनेजर ग्रेड बी पदांसाठी ४ जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) पदांसाठी ४ जागा रिक्त आहेत.त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आयपीएलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक/बी.ई, एलएलबी, सीए, एमबीए / पीजीडीएम किंवा पीजीडीबीएम डिग्री प्राप्त केलेली असावी. पदवीप्राप्त उमेदवारच या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरायचे आहे. मॅनेजर ग्रेज बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४०पेक्षा कमी असावे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० पेक्षा जास्त नसावी.

IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेड (IPL) ने इतर अनेक पदांसाठीही भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन चेक करुन अर्ज करु शकतात. आयआयएसीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे ज्या लोकांना मॅनेजर पदावर काम करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: १ तोळे सोन्यासाठी ९८,१७० रुपये मोजावे लागणार; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर काय?

Maharashtra Live News Update : कल्याण डोंबिवलीत डेंग्यू मलेरियाचा धोका वाढला

Vastu Shanti Puja: घरात वास्तुशांती पूजा करताना या गोष्टी टाळाच, नाहीतर होईल नुकसान

Monsoon Mobile Tips: पावसाळ्यात तुमच्या स्मार्टफोनची कशी काळजी घ्याल? 'ही' एक चूक महागात पडू शकते

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाच्या दरबारी १ कोटी रुपयांचा चांदीचा दरवाजा; अहिल्यानगरच्या दोन व्यापाऱ्यांकडून अर्पण

SCROLL FOR NEXT