IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: खुशखबर! इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी आहे. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी

इंजिनियर आणि ऑफिसर पदांसाठी भरती

मिळणार १६०००० रुपये पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर आणि ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ५ सप्टेंबरपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

पात्रता (Indian Oil Recruitment Eligibility)

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक/ बी.ई/ किंवा संबंधित पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना केमिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग विभागात नियुक्ती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २६ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर इंजिनियर्स आणि ऑफिसर पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची सीबीटी टेस्ट होणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. सीबीटी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाप आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत तुम्हाला ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी असणार आहे. या परीक्षेसाठी घेण्यात येणारी परीक्षा ५० गुणांची असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT