IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; १७७० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही ITI पास असाल अन् नोकरी शोधताय तर या नोकरीसाठी लगेचच अर्ज करा. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी तुम्हाला iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही ३ मे पासून या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Indian Oil Recruitment)

इंडियन ऑइलमध्ये (IOCL Apprentice Recruitment) १७७० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही २ जूनपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात येईल.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे असावीत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

तुम्हाला सर्वप्रथम iocl.com या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Apprentice Recruitment 2025 सेक्शनवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा.

यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT