Indian Army Job Saam Tv
naukri-job-news

Indian Army : इंडियन आर्मीत नोकरी, पगार २,१८,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा? जाणून घ्या

Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात सध्य विविध पदांसाठी भरती केली जात आहे.

Siddhi Hande

अनेक तरुणांची देशसेवा करण्याची इच्छा असते.त्यामुळे अनेकांचे आर्मी, नौदलात किंवा वायूदलात काम करण्याचे स्वप्न असते. जर तुमचेही आर्मीमध्ये काम करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या भारतीय सैन्यात भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय सैन्यात जज अॅडवोकेट जनरल शाखाअंतर्गत भरती केली जाणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून लॉ ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन आर्मीतील या पदासाठी लॉ ग्रॅज्युएट असण्यासोबतच उमेदवारांनी अविवाहित असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. या भरती मोहिमेत एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही भारतीय सैन्यात अधिकारी बनायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत.

भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केलेले असावे. याचसोबत CLAT चा स्कोर असणे आवश्यक आहे. याचसोबत उमेदवारांचे बार काउंसिल ऑफ इंडिया किंवा राज्याच्या बार काउंसिलमध्ये वकील म्हणून रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. इंडियन आर्मीमधील या नोकरीसाठी २१ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (Indian Army Recruitment)

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ऑफिर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या नोकरीसाठी प्रशिक्षणाच्या कालावधीत ५६,१०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. त्यानंतर निवड झाल्यावर ५६,००० रुपये ते २,१८,२०० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची सर्व्हिस सिलेक्शन बोर्डद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक टेस्ट झाल्यावर उमेदवारांना रुजू केले जाईल. (Indian Army Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT