Indian Army 
naukri-job-news

Indian Army: इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट बनण्याची सुवर्णसंधी, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करू शकणार अर्ज

Indian Army: भारतीय लष्करात तुम्ही लेफ्टनंट बनण्याचं स्वप्न पाहत आहात का? हो तर तुमच्यासाठी हा आनंदाची बातमी आहे. १२ वी पास उमेदवार आता थेट लेफ्टनंट होऊ शकतात.

Bharat Jadhav

जर तुम्हाला देशसेवा करायची आहे आणि सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय लष्करात थेट लेफ्टनंट होण्याची संधी चालू आलीय. भारतीय लष्कराने तांत्रिक प्रवेश योजना (TES-53) भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केलीय.

यासोबतच भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर याबाबत माहिती देण्यात आलीय. तर ज्या इच्छुकांना नोकरी करायची आहे, ते उमेदवार या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर २०२४ आहे.

ही भरती बारावी पास टेक्निकल एंट्री स्कीम (TES-53) अंतर्गत केली जाणार आहे. या नोकरीच्या जाहिरातीची माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू घेऊ शकतात.

https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/NOTIFICATION_FOR_TES-53_COURSE.pdf

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) मध्ये किमान ६० % गुण असणे अनिवार्य आहे. यासह JEE Mains 2024 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी १६ वर्ष ६ महिने आणि जास्तीत जास्त १९ वर्ष ६ महिने, असावे. जन्मतारीख २ जानेवारी २००६ च्या आधी आणि १ जानेवारी २००९ नंतरची असून नये.

किती असेल पगार

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ट्रेनिग दरम्यान प्रतिमाह ५६,१०० रुपयांचे वेतन दिल जाईल. तर ट्रेनिगचा कालावधी ४ वर्ष राहिल, त्यानंतर थेट लेफ्टनंटच्या पदावर नियुक्ती केली जाईल. उमेदवारांची निवड ही SSB मुलाखत, मेडिकल, आणि मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे. तर अर्ज करण्यासाठी कोणतेच शुल्क लागणार नाही. मुलाखतीसाठी कटऑफची यादी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल जाईल. भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष अर्ज करू शकतील. सविस्तर माहितीसीठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT