HAL Recruitment Saam TV
naukri-job-news

HAL Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; पगार १ लाख ६० हजार; पात्रता काय?

Hindustan Aeronatucs Limited Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मेडिकल फिल्डमध्ये चांगले करिअर करायचे आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. (Hindustan Aeronautics Recruitment)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२४ आहे. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Government job)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये मेडिकल ऑफिसर पदावर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी.तसेच MS/DNB/DLO संबंधित विषयात ईएनटी/ मेडिसिन/ ऑर्थो/ जनरल ड्युटीमध्ये पीजी डिप्लोमा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.

एचएएल ग्रेड २ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यदा ३० वर्ष असावी. तर ग्रेड ३ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यास ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांना ५०००० ते १६०००० रुपये पगार मिळणार आहे. तर ग्रेड २ पदासाठी उमेदवारांना ४०००० ते १४०००० रुपये पगार दिला जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT