Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: भारत सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार;अर्ज कसा करावा?

UCIL Recruitment 2024: तरुणांकडे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मायनिंग गेट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही https://ucil.gov.in/job.html या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Government Job)

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५० वर्ष असायला हवी. तसेच राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जाचा नमुना, पासपोर्ट साइज फोटो, मॅट्रिक प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे,शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र द्यायचे आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पीओ जादुगोरा खान- जिल्हा पूर्व सिंगभूम, झारखंड ८३२१०२ येथे पाठवायचा आहे. तुम्ही अर्जाचा नमुना अधिसूचनेतून मिळवू शकतात. (Uranium Corporation Of India Limited Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे DGMS द्वारे जारी केलेले मायनिंग मेट सक्षमता प्रमाणपत्र, अनिर्बंधित फोरमॅन सक्षमका प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेलुगु भाषा वाचणे, लिहणे येणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT