PGCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

PGCIL Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सध्या २५ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सध्या सेक्रेटरी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (PGCIL Recruitment)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी powergrid.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २५ डिसेंबर २०२४ रोजी या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली होती. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.२५ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. (PGCIL Recruitment 2025)

या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा. जर तुम्ही काही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म अप्रुव्ह केला जाणार नाही. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्ही वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्ही powergrid.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर करिअर सेक्शनवर जा. यानंतर पीजीसीआयएल कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती आणि शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT