NABARD Job Saam Tv
naukri-job-news

NABARD Job: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; स्पेशलिस्ट पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

NABARD Recruitment 2024: नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.नाबार्डमध्ये सध्या स्पेशलिस्ट पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हपमेंट बँक म्हणजेच नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये स्पेशलिस्ट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

नाबार्डमधील या नोकरीसाठी तुम्ही २१ डिसेंबरपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल.

या नोकरीसाठी ग्रॅज्युएट/ बीई/बीटेक / एमटेक / एमसीए / एमएसडब्ल्यू पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. २४ ते ५५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता यांच्या आधारावर निवड केली जाणार आहे.

नाबार्डमध्ये एकूण १० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ETL डेवलपर, डेटा सायंटिस्ट, सिनियर बिझनेस अॅनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट, स्पेशलिस्ट डेटा मॅनेजमेंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. सायबर सिक्युरिटी- सिनियर ॲनालिस्ट पदासाठीही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

अर्ज कसा करावा

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला www.nabard.org या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर करिअर बटणवर क्लिक करा. त्यानंतर भरती मोहिमेत संबंधित लिंकवर जाऊन क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करावे. यानंतर तुम्हाला तुमची माहिती, फोटो आणि सही अपलोड करायची आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. परंतु त्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT