Mahatransco Job Saam Tv
naukri-job-news

Mahatransco Job: पुणेकरांसाठी खुशखबर! महाट्रान्स्कोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १०वी पास तरुण करु शकतात अप्लाय; जाणून घ्या सविस्तर

Mahatransco Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महाट्रान्स्को पुणे येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात (Job) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाट्रान्स्कोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. १०वी पास तरुणांसाठी महाट्रान्स्को पुणे विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटडेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ६८ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. महाट्रान्स्कोमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Mahatransco Recruitment 2024)

महाट्रान्स्को पुणे येथे अप्रेंटिस/ इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असावे.

महाट्रान्स्कोमधील या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४, २५ आणि ३१ ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Mahatransco Pune Recruitment 2024)

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतदेखील भरती सुरु आहे. निरीक्षक या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १७८ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कर निर्धारण आणि संकलन खात्या ग्रुप सी निरीक्षक पदावर काम करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT