Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; इंडियन ऑइलमध्ये २४० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Oil Recruitment 2024: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये तब्बल २४० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे. (Indian Oil Job)

इंडियन ऑइलमध्ये इंजिनियरिंग आणि नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स पदासाठी भरती करण्यात येणार आहे.यात मेकॅनिकल इंजिनियरिंग, सिविल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग पदासाठी भरती केली जाणार आहे. इंजिनियरिंग पदासाठी १२० जागा रिक्त आहे. नॉन इंजिनियरिंग पदासाठी १२० जागा रिक्त आहेत. एकूण २४० जागांसाठी भरती केली जाणार आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्याताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजीमध्ये फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा. तसेच नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. (Government Job)

या नोकरीसाठी डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १०,५०० रुपये स्टायपेंड पगार मिळणार आहे. नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ११५०० रुपयांची स्टायपेंड मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय करण्यात येणार आहे. (Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT