Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Hindustan Copper Limited Recruitment 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. कोणत्याही परिक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. (Government Job)

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील ही भरती चार्जमॅन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन ए आणि बी, मायनिंग मेट या पदांसाठी होणार आहे. ९६ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे २० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे आहे. (Hindustan Copper Limited Recruitmeny)

चार्जमॅन इलेक्ट्रिकल पदासाठी २३ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन ए आणि बी पदासाठी ३६-३६ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तुम्हाला hindustancopper.com या वेबसाइटवर सविस्तर माहिती मिळेल.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील या नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन १६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. हा इंटव्ह्यू कॉन्फरन्स हॉल, अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग खेत्री कॉम्प्लेक्स, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, राजस्थान या पत्त्यावर पोहचायचे आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २८१५२- ३१२८० रुपये पगार मिळणार आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया भरती

सध्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेलमध्ये मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. तुम्ही sai.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT