Government job Saam Tv
naukri-job-news

Government Job:सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुरु आहे भरती;मिळणार २ लाख रुपये पगार

ESIC Recruitment: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर पदासांठी रिक्त जागा आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. esic.gov.in या वेबसाइटवर या नोकरीबाबत सर्व माहिती दिलेली आहे.

ESIC च्या या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी एकूण २२ पदे भरती केली जाणार आहे. प्रोफेसर या पदासाठी ६ रिक्त जागा आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी १६ जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन्स, ऑर्थोपेडिकस, रेडिओ डायग्नोसिस या विभागात प्रोफेसर भरती केली जाणार आहे.

प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २,११,८७८ रुपये पगार मिळणार आहे तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी १,४०,८९४ रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी संबंधित विषयात पोसट ग्रॅज्युएशनची पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.याचसोबत ६-९ वर्षांचा अनुभ असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी हा इंटरव्ह्यू होणार आहे. न्यू अकॅडमिक ब्लॉक,ESIC MC & PGIMSR,राजाजी नगर, बंगळुरु येथे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ९.३० ते १०.३० या कालावधीत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT