ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ESIC मध्ये ५५८ रिक्त पदांसाठी भरती; पगार ७८०००; अर्ज कसा करावा?

ESIC Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बाकमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पेशलिस्ट ग्रेड २ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची २६ एप्रिल २०२५ आहे. तर काही राज्यांसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २ मे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता

कर्मचारी राज्य विमा निगममधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमडी/एमसीएच / डीए / एमएससी / डीपीएम पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.

ईएसआयसीमधील नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिक्रूटमेंट सेक्शनवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला निर्धारित फॉर्मॅट दिला आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ईएसआयसीमधील ही भरती ५५८ रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. यामध्ये स्पेशलिस्ट ग्रेड २ पदासाठी १५५ रिक्त जागा आहे. स्पेशलिस्ट ग्रेड २ ज्युनिअर स्केलसाठी ४०३ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी उमेदवारांना लेव्हल १२, ७ सीपीसीनुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी ७८,८०० रुपये पगार दिला जाणार आहे.याशिवाय तुम्हाला टीए, डीए, एचआरए दिला जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT