ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,७७,००० रुपये पगार;ESIC मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ESIC मध्ये ऑफिसर ग्रेड २ पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

विमा मेडिकल ऑफिसर ग्रेड II पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.कर्मचारी राज्य विमा महामंडळात ६०८ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ३१ जानेवारी २०२५ आधी अर्ज करावेत. (Government Job)

या नोकरीसाठी उमेदवारांची भरती आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील २५४ जागा रिक्त आहेत. राखीव प्रवर्गासाठी ३४९ जागा रिक्त आहेत.या नोकरीमध्ये दिव्यांगांसाठी ९० पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. (ESIC Recruitment)

या नोकरीबाबत अधिसूचना ESIC च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. (ESIC Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT