BRO Bharti 2024 Saam Tv
naukri-job-news

BRO Bharti 2024: संरक्षण मंत्रालयात मेगाभरती; दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, आजच करा अर्ज

BRO Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. बोर्ड रोड ऑर्गनायझेशनमध्ये दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ४०० पेक्षा अधिक रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रायलाअंतर्गत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला recruitment.bro.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. ४६६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

यामध्ये ड्राफ्ट्समॅन, सुपरवायजर, टर्नर, मेकॅनिस्ट, ड्रायव्हर मॅकेनिस्ट ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर रोज रोलर, उत्खनन मशिनरी ऑपरेटर अशा विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.तसेच संबंधित क्षेत्रातील आयटीआय सर्टिफिकेट असायला हवे.

या नोकरीसाठी ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हेवी मोटर वाहन चालवण्याचे लायसन्स असायला हवे.या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट घेतली जाते. यानंतर कागदपत्रे पडताळणी करुन मेडिकलसाठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT