Central Bank of India Saam Tv
naukri-job-news

Central Bank Jobs: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २६६ रिक्त जागा; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल १ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्यास २१ जानेवारी म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Central Bank of India Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. मेडिकल, इंजिनियरिंग आणि सीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्जदाराचे वय २१ ते ३२ वर्षांमध्ये असावे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे लागेल.

Click here for New Registration यावर क्लिक करायचं आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर सर्व माहिती भरावी.

यानंतर सही आणि फोटोग्राफ अपलोड करायचे आहे. यानंतर शुल्क भरायचे आहे.यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क जमा करायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये २६६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यातील अहमदाबादमध्ये १२३ पदे रिक्त आहेत. चेन्नईत ५८ पदे रिक्त आहेत. गुवाहाटीमध्ये ४३ रिक्त जागा आहेत. हैदराबादमध्ये ४२ जागा रिक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT