Delhi Metro Job Saam Tv
naukri-job-news

Delhi Metro Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार दिल्ली मेट्रोत नोकरी; पगार ६०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Delhi Metro Recruitment: दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सिक्युरिटी इन्स्पेक्टर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना भरघोस पगारदेखील मिळणार आहे.

Siddhi Hande

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोमध्ये सिक्युरिटी इन्स्पेक्टर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही delhimetrorail.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

दिल्ली मेट्रोतील या भरती मोहिमेत इन्स्पेक्टर पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ८ मे किंवा त्याआधी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी ५५ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना ५११०० ते ५९,८०० रुपये पगार मिळणार आहे.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. फक्त शॉर्टलिस्टेड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्जाचा नमुना भरुन ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली-११०००१ येथे पाठवायचा आहे.

NTPC ग्रीन एनर्जीमध्ये नोकरीची संधी

सध्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ngel.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT