BMC Job Saam Tv
naukri-job-news

BMC Job: मुंबई महानगरपालिकेत नोकरी अन् १४२००० रुपये पगार; ६९० जागांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६९० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता (सिव्हिल),दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून नंतर अर्ज करावेत. (BMC Jobs)

मुंबई महानगरपालिकेसारख्या मोठ्या विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. राज्य सरकारअंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे.१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत अधिक माहिती ११ नोव्हेंबर रोजी वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल.

मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदासाठी ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती इच्छुक उमेदवारांनी वाचा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी झाल्यानंतर तीन वर्षांचा स्थापत्य, कन्सट्रक्शन टेक्नोलॉजीमधील पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत एमएसआयटी आणि समक्षक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (BMC Recruitment 2024)

कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० रुपये वेतन मिळणार आहे. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी १३० जागा भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदासाठी २३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT