BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: १० वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; मुंबई महापालिकेत भरती; असा करा अर्ज

BMC Recruitment 2024: मुंबई महानरपालिकेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज कसा करायचा आणि पदासाठी पात्रता जाणून घ्या.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या नोकरीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. १० वी पास ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कार्यकारी सहाय्यक पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास, वाणिज्य/ विज्ञान/ कला शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांना २२,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सहाय्यक कार्यकारी पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची परीक्षा पास करावी लागेल. उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन,डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल,इंटरनेट याबाब उत्तम ज्ञान असावे.

या नोकरीसाठी अर्जासोबतच तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा,एसएससी गुणपत्रिका, ओळख पुरावा, पदवी परीक्षेची गुणपत्रिका, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो जोडणे आवश्यक आहे.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज बा.य.ल.नायर धर्मा. रुग्णालय,डॉ.ए.एल.नायर रोड,मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ या पत्त्यावर करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT