AAI Recruitment 2025 Saam Tv
naukri-job-news

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार १,४०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

AAI Recruitment 2025: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती होणार आहे.

एएआयमधील (AAI Recruitment) या नोकरीसाठी ९७६ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया अजून सुरु झालेली नाही. अर्जप्रक्रिया २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चर / इंजिनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवारांनी गेट परीक्षा पास केलेली असावी. या परीक्षेचे गेट कार्ड त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २७ वर्षे असावी. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये फी भरायची आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांची एक वर्षाची ट्रेनिंग पूर्ण झाली असेल तर त्यांना शुल्क भरावे लागणार नाही.

चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगारदेखील मिळणार आहे. तुम्हाला २८ तारखेनंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT