Zomato Saam TV
देश विदेश

Zomato Tweet Viral : 'अंकिता तुझा एक्स बॉयफ्रेंड पैसे देत नाही...', झोमॅटोचं ट्वीट व्हायरल; नेमकं झालंय काय?

Viral News : झोमॅटोने भोपाळमध्ये राहणाऱ्या 'अंकिता'ला उद्देशून हे ट्वीट केलं आहे.

प्रविण वाकचौरे

Zomato Tweet : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. झोमॅटोच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकदा व्हायरल होतात. असंच एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झोमॅटोने भोपाळमध्ये राहणाऱ्या 'अंकिता'ला उद्देशून हे ट्वीट केलं आहे.

झोमॅटोने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरीवर फूट पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. यामागे Zomato ने दिलेले कारण खूपच मजेशीर आहे.

झोमॅटोच्या ट्वीटनुसार, 'अंकिता' तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरी (COD) मोडवर सतत फूड पाठवत होती. म्हणजे या ऑर्डरचे पैसे 'अंकिता'च्या एक्स बॉयफ्रेंडने देणे अपेक्षित आहे. पण अंकिताचे एक्स बॉयफ्रेंड ऑर्डरचे पैसे देण्यास नकार देत होता. हे एक-दोनदा नाही तर तीन वेळा घडले. (Latest News Update)

Zomato Tweet

अखेर याबाबत झोमॅटोनेच ट्वीट केले आहे. झोमॅटोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरीवर अन्न पाठवणे थांबवा. तिसऱ्यांदा तो पैसे देण्यास नकार देत आहे.

Zomatoचं हे ट्वीट आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. आतापर्यंत 5.50 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 7000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

SCROLL FOR NEXT