Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: अरे हा गरबा आहे की सेल्फ डिफेन्स अकॅडमी, पोरांचा काठीने दांडिया खेळतानाचा VIDEO तुफान व्हायरल

Young Boy Viral Video: सोशल मीडियावर काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अनोख्या पद्धतीने दांडिया खेळताना दिसून येत आहे.

Tanvi Pol

Navratri Special Dandiya: राज्यभरात नवरात्रीचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यातील विविध भागानुसार नवरात्रीच्या परंपरा बदलत असतात. नवरात्रीमध्ये सर्वजण गरबा- दांडिया खेळताना दिसून येतात. सोशल मीडियावर राज्यातील तसेच दुसऱ्या देशातीलही दांडिया आणि गरबा खेळणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. अशातच सोशल मीडियावरही काही तरुणांचा नवरात्रीमधील दांडिया खेळतानाचा व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे. जो तरुणांचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ का ऐवढा खास आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहूनच ठरवा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ नवरात्री निमित्ताने सर्वजण गरबा खेळताना दिसत आहेत. सर्व परिसर विविध लाईट्सने सजवलेला आहे. या परिसरात अनेक नागरिक दिसून येत आहेत. मात्र व्हिडिओ फक्त काही तरुण दिसत आहे. जे दोन दोन गटने समोरा समोर उभे आहेत. व्हिडिओत पुढे पाहिले तर समजेल की ते एका मोठ्या काठीने चक्क दांडिया खेळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तरुण सर्व ''ए जी, ओ जी ए जी'' या बॉलिवूडमधील फेमस गाण्यावर दांडिया(Dandiya) खेळत आहे. तुम्ही यापूर्वी असा दांडिया कधीच पाहिला नसेल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''@anup.ammusic''या अकाउंटवर तीन दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये अनेक हॅशटॅग देण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल ६५ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत.

नेटकऱ्यांच्या हटके प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केलाही जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,'' व्हिडिओचा पार्ट २ पाहण्यासाठी या पेजला फॉलो करा'' असे लिहिण्यात आलेले आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने,''हा डान्स कधी मारामारीत बदलेले काही सांगता येत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काही पण म्हणा वाईब आहे'' अशा अनेक छान छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT