Merut News  Saam TV
देश विदेश

CCTV Footage : टोपी घालून कॉलेजला आलेल्या तरुणावर हल्ला; मेरठमधील घटनेने खळबळ, VIDEO व्हायरल

Crime News : पोलिसांनी १० तरुणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे.

प्रविण वाकचौरे

Merut News :

मेरठच्या एनएएस पीजी कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी टोपी घालून आलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडित तरुण आपल्या बहिणीसोबत कॉलेजमध्ये फी जमा करण्यासाठी गेला होता. मात्र त्याने धार्मिक टोपी घातल्याने त्याच्या हल्ला झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिसाडी गेट झाकीर कॉलनीत राहणारी अल्फिशा ही मेरठच्या एनएएस पीजी कॉलेजमध्ये बीएससी होम सायन्सच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. मंगळवारी ती फी जमा करण्यासाठी भाऊ साहिलसोबत कॉलेजमध्ये गेली होती. विद्यार्थिनी काउंटरवर फी जमा करत असताना तिचा भाऊ पार्किंग एरियाजवळ उभा होता. यावेळी साहिलने टोपी घातली होती. (Latest Marathi News)

साहिलला टोपी घातलेली पाहून काही मुलांनी त्याच्यावर जात आणि धर्माशी संबंधित कमेंट्स केल्याचा आरोप आहे. साहिलने विरोध केला असता तरुणांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या भावाला थप्पड मारल्याचा विद्यार्थिनीचा आरोप आहे.  (Mumbai NEws)

अल्फिशा आणि साहिलने घटनेनंतर तात्काळ पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. पोलिसांनी १० तरुणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक स्कूटर जप्त केली आहे. ही स्कूटर आरोपी तरुणांची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohan Bhagwat: भारताचा आर्थिक विकास होतोय, पण गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी वाढली: मोहन भागवत

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

SCROLL FOR NEXT