पाकची नापाक कारस्थाने; रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग, पहा व्हिडीओ 
देश विदेश

पाकची नापाक कारस्थाने; रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग, पहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहोरमधील (lahour) असल्याचं काही नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली

पाकिस्तानात (Pakistan) पुन्हा एका महिलेचा विनयभंग (molestation) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका चालत्या रिक्षात एका महिलेचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहोरमधील (lahour) असल्याचं काही नेटकऱ्यांच म्हणणं आहे. पाकिस्तानातील वर्दळीच्या रस्त्यावर एक व्यक्ती रिक्षात उडी मारुन प्रवासी महिलेचं चुंबन घेत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत वर्दळीच्या रस्त्यावर दोन महिला रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत. मात्र रिक्षाचा मागील भाग खुला असल्यानं एक व्यक्तीने त्यात उडी घेतली आणि रिक्षाच्या मागच्या बाजूला बसलेल्या महिलेचं चुंबन घेतलं. या प्रकारामुळे महिला पुर्णपणे गोंधळून गेल्याचं दिसत आहे.यावेळी तिच्यासोबत असलेली महिला संतप्त झालेली दिसली, मात्र इतर सहप्रवाशांनी समजवल्यानंतर ती शांत झाली. मात्र पाकिस्तानातील रस्त्यावर आणि तेही वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या प्रकारामुळे पाकिस्तानातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचं दिसून येतं.

दरम्यान, 14 ऑगस्टला एका टिकटॉकर महिलेच्या विनयभंगांची घटना ताजी असतानाच पाकिस्तानातून ही बातमी समोर आली आहे. लाहोरमध्ये एका युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या आणि टिक टॉकर महिलेवर 400 लोकांच्या जमावानं हल्ला केला. तिचे कपडे देखील फाडण्यात आले. हा प्रकरणामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं संबंधित हल्लेखोरांना अटक केली. मात्र या घटनेनेही पाकिस्तानातील असा विकृतांवर काहीही फरक पडल्याचे दिसून येत नाही. आता य़ा घटनांच्या पार्श्वभुमीवर नेटकऱ्यांनी त्या व्यक्तींविरोधात आणि महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT