Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: आकाश पाळणा सुरू होताच तरुणाने घेतली झेप, पुढे जे घडलं ते काळजात धडकी भरवणारं

तरुण सरळ पळण्याबाहेर असलेल्या एका दांडक्याला लोंबकळतो.

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होतं असतात. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या जत्रा सुरू आहेत. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जत्रा म्हटल्यावर खेळणी, आकर्षक पाळणे आणि जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ आलेच. अशात या जत्रेत एका तरुणाने अशी काही स्टंटबाजी केली आहे की, पाहणारे अवाक झाले आहेत. (Latest Viral Video)

जत्रेत गेल्यावर कानाला कर्कश वाटणारा भोग्यांचा आवाजही एकावा लागतो. जत्रेत आकशापळण्यात बसायला अनेकांना आवडतं. यात पोटात कितीही मोठा गोळा आला तरी हौस मात्र भली मोठी असते. सध्या सोशल मीडियावर याच गगनाला भिडलेल्या एका आकश पाळण्याबरोबर एका मुलाने केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण आकशापळण्याच्या खाली उभा आहे. थोड्यावेळाने पाळणा सुरू होतो. पाळणा सुरू होताच त्यात बसून एन्जॉय करण्याऐवजी हा तरुण सरळ पळण्याबाहेर असलेल्या एका दांडक्याला लोंबकळतो. पाळणा सुरू झाल्याने तो सरळ वरती जातो आणि पळण्याबरोबर खाली येतो.

त्याचा स्टंट पाहून आकाश पाळण्यात बसलेल्या आणि खाली उभे राहून पाहणाऱ्या सर्वांच्याच काळजात धडकी भरते. तरुणाची अशी स्टंटबाजी सुरू असताना एकाने त्याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. नरेंद्र सिंग याने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच याला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, " जत्रेत अशी स्टंटबाजी कधीच करू नका, कारण यात तुम्ही खतरों के खिलाडी नाही तर सरफीरे जास्त वाटता. नेटकरी देखील या तरुणावर ओरडताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT