yogi
yogi Saam Tv
देश विदेश

गॅरेज मार्केटची निवडणुकीत चर्चा; योगी सरकारकडून एका रात्रीत कारवाई

सोनाली शिंदे

मेरठ - भारतातलं सगळ्यात मोठं गॅरेज मार्केट म्हणून पाहिलं जातं मेरठच्या सौतीगंज गॅरेज मार्केटकडे. 1950 पासून इथं हे मार्केट असल्याचा दावा केला जातो. डिसेंबरच्या 18 तारखेला एक नोटीस येते आणि  दुसऱ्या दिवसापासून तुमचे उद्योग बंद करा, असं सांगितलं जातं. योगी सरकारकडून एका रात्रीत ही कारवाई केली गेली. ऐन निवडणुकीच्या (Election) तोंडावर केलेली ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप केला जात आहे.

हे देखील पहा -

चोरीच्या गाड्यांची इथे खरेदी विक्री केली जाते, तसंच या गाड्या इथं आणून त्या कापल्या जातात. यातून कोट्यवधींच अवैध संपत्ती मिळवल्याचा आरोप या गॅरेज व्यापाऱ्यांवर आहे. सध्या दोनशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल आहे. चार जणांवर गॅंगस्टरचा गुन्हा देखील दाखल आहे. या सगळ्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणातही टिपण्णी केली.

ज्यांनी चुकीची कामं केली, ते जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर जरुर कारवाई करा. पण म्हणून सर्व उद्योग एका रात्रीत बंद करुन शेकडो कुटुंबाना शिक्षा कशाला देता, अशी मागणी इथल्या गॅरेज धारकांची आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेला हा सगळा प्रकार केवळ धार्मिक ध्रुवीकरणासाठी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या मतदारांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Viral Video: लाईव्ह सामन्यात विराट अंपायरशी भिडला! नेमकं काय घडलं? पाहा Video

Diabetes: मधुमेहींनो रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी खा हे पदार्थ

Maharashtra Election Voting LIVE : पुण्यात आणखी एक केंद्रावर मशीन पडली बंद

Jui Gadkari News : 'फॅनपेज बनवण्यापर्यंत ठिकेय, पण...', फेक अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक केल्यामुळे जुई गडकरी संतापली

Sujay Vikhe Patil Ahemadnagar | "रोहित पवार 2019 मधील Video विसरले का?", विखेंचा सवाल

SCROLL FOR NEXT