Wrestlers Protest Updates ANI
देश विदेश

Wrestlers Protest Updates: जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन अखेर मागे; भारतीय ऑलम्पिक संघाच्या समितीने केली 'ही' घोषणा

धरणे आंदोलन देत होते. हे आंदोलन अखेर क्रीडा मंत्र्यांसोबत ७ तास चालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आले.

Shivaji Kale

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला पहलवानांनी लैगिक शोषणाचे गंभीर आरोप करत बृजभूषण शरणसिंहला हटवण्यात यावं तसंच भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात यावा या मागणीसाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राजधानी दिल्ली इथल्या जंतरमंतरवर १८ जानेवारीपासून धरणे आंदोलन देत होते. हे आंदोलन अखेर क्रीडा मंत्र्यांसोबत ७ तास चालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आले. (Latest Marathi News)

भारतीय ऑलम्पिक संघाने 7 सदस्यीय समितीची घोषणा केली असून ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात चौकशी करेल. ही समिती बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची ४ आठवड्यांच्या आत चौकशी करेल.

या समितीत मैरी कॉम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि कायदा तज्ज्ञांचा समावेश असेल. तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून स्वतःला लांब ठेवतील. आणि चौकशीमध्ये सहकार्य करतील. तोपर्यंत कुस्ती महासंघांचे काम एक समिती करेल.

दरम्यान, १९ जानेवारीला पहिलवानांच्या या सर्व समस्या ऐकून घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सर्व खेळाडूंना (Players) जेवणासाठी बोलावलं होतं. मात्र, या डीनर डिप्लोमसीमध्येही कुठलाही तोडगा निघाला नव्हता. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 72 तासाचा वेळ दिला आहे. तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना वेळ द्यायला हवा असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, तर खाप पंचायत देखील खेळाडूंच्या समर्थनार्थ दिल्लीच्या (Delhi) जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर, काल बृजभूषण शरण सिंह या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होते मात्र, त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT