गृहयुद्धाच्या छायेत असलेल्या म्यानमारमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर मंडाले प्रांतातील जगप्रसिद्ध 'मोगोक' भागात खाण कामगारांना मौल्यवान माणिक रत्न गवसलंय. हा खडा जगातील वजनाने सर्वात मोठा दुसरा माणिक ठरला आहे. म्यानमारच्या लष्करी राजवटीचे प्रमुख आणि नुकतेच राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेले मिन आँग ह्लाइंग यांनी राजधानी नायपिडो येथील आपल्या कार्यालयात मंत्रिमंडळासह या दुर्मिळ खड्याची पाहणी केली. त्याची वैशिष्ट्ये पाहूयात...
- म्यानमारमधील सर्वात मोठा दुसरा माणिक
- वजन - 11 हजार कॅरेट (म्हणजेच 4.8 पौंड किंवा 2.2 किलोग्रॅम)
-रंग - जांभळा-लाल आणि पिवळसर छटा
-गुणवत्ता - उत्कृष्ट दर्जा, पारदर्शकता आणि चमक
- 1996 मध्ये सापडलेला 21,450 कॅरेटचा (4.29 किलो) माणिक म्यानमारमधील सर्वात मोठा माणिक आहे
नव्या माणिकचे म्हणजे रुबीचे वजन 1996 मध्ये सापडलेल्या खड्याच्या तुलनेत निम्मे असले, तरी त्याचा रंग, स्पष्टता म्हणजे क्लिअरीटी आणि उत्कृष्ट दर्जा पाहता हा खडा अधिक मौल्यवान आणि महागडा ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. म्यानमारमधून जगभरातील एकूण उत्पादनांपैकी तब्बल 90 टक्के माणिक मिळतात. येथील 'पिजन-ब्लड' रंगाचे माणिक जागतिक बाजारात कोट्यवधी रुपयांना विकले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 'ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मी' या बंडखोर गटाने या खाण क्षेत्रावर ताबा मिळवला होता. मात्र, त्यानंतर चीनच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धबंदी करारांतर्गत हा भाग पुन्हा लष्कराच्या नियंत्रणात आला आहे. मौल्यवान खड्यांचा आणि रत्नांचा व्यापार म्यानमारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. या नवीन मौल्यवान माणिकमुळे मंडालेच्या 'मोगोक' खाणीचं महत्व आणखी वाढलंय हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.