Odisha: कंपनीने पगारवाढ द्यावी म्हणून कामगाराने उचलले टोकाचे पाऊल Saam TV
देश विदेश

Odisha: कंपनीने पगारवाढ द्यावी म्हणून कामगाराने उचलले टोकाचे पाऊल

जुधिष्ठीर पढाण असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बारगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे.

वृत्तसंस्था

भुवनेश्वर: ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील एका खाजगी फर्मच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी माओवादी असल्याचे सांगून फर्मच्या व्यवस्थापनास धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, कारण तो त्याच्या पगारात समाधानी नव्हता. जुधिष्ठीर पढाण असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बारगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तो झारसुगुडा जिल्ह्यातील एका खाजगी फर्ममध्ये फिटर म्हणून काम करत होता. त्याचा मासिक पगार 22,000 रुपये होता. मात्र तो त्याच्या पगारात खूश नव्हता. त्याला असे वाटले की स्थानिक रहिवाशांना कामाचा अधिक मोबदला दिला जात नाही तर पश्चिम ओडिशाच्या बाहेरच्या लोकांना जास्त पैसे दिले जात आहेत. पगारवाढ मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले परंतु ते सर्व अयशस्वी झाले. मग त्याने कंपनी व्यवस्थापनाला त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना कामाचा चांगला मोबदला मिळवण्यासाठी घाबरवण्याचा निर्णय घेतला.

29 जुलै रोजी खाजगी कंपनीचे साईट इन-चार्च अबुतर खान यांना पश्चिम ओडिशामधील माओवाद्यांच्या संघटनेचे असल्याचा दावा करणारे पत्र मिळाले. संघटनेच्या प्रमुखाची स्वाक्षरी असलेल्या या पत्रात धमकी देणारा संदेश होता की पश्चिम ओडिशामधील कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ न दिल्यास साईट इन-चार्चची हत्या केली जाईल. या पत्रात आठ कर्मचाऱ्यांची नावे होती ज्यांना कंपनीने जास्त पैसे द्यावे अशी मागणी केली होती. तसेच साईट इन-चार्चला अनेक धमकीचे फोन कॉल्स आणि मेसेजेस देखील आले. कंपनीच्या मानव संसाधन विभागालाही असेच धमकीचे पत्र आले आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.

अलीकडेच, कंपनीच्या साइट इन-चार्चने या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे, बडमाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली. पोलिसांनी साइटवर इन-चार्चला धमकी देण्यासाठी वापरलेले मोबाईल फोन नंबर ट्रॅक केले. परिणामी, या गुन्ह्यासाठी पढानला अटक करण्यात आली.

"मी 12 वर्षांपासून कंपनीत काम करत आहे. बाहेरून आलेल्यांना स्थानिकांच्या तुलनेत जास्त पगार मिळत होता. मी अनेक वेळा पगारवाढ मागितली होती पण कोणीही ऐकले नाही. मला वाटले की मी व्यवस्थापनाला घाबरवले तर आम्हाला चांगला पगार मिळू शकतो, ”असे अटक केलेल्याच्या अहवालात म्हटले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT